Author Topic: तुझे भास पावसाचे. ..  (Read 2142 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
तुझे भास पावसाचे. ..
« on: August 19, 2014, 08:14:44 PM »
तुझे भास पावसाचे

तुझे भास पावसाचे
आणी मनी शहारे
तुझे संकेत मिलनाचे
समजून घे इशारे
      -०-
तुझे भास पावसाचे
प्रीती चिंब भिजून जावी
या थंड गारव्यात
तू जवळी असावी
      -०-
तुझे भास पावसाचे
हूड हुडी मनी भरावी
पंखात पंख मिळवूनी
मिठीत रात्र जावी
      -०-
तुझे भास पावसाचे
दूर भासतो किनारा
लाटेत सागराच्या
तो मन-मोही दरारा
      -०-
तुझे भास पावसाचे
जागवी मनी त्या भावना
शहारून अंग यावे
तुझ्या मिलनाच्या कल्पना
      -०-
श्री प्रकाश साळवी दि. १९ ऑगस्ट २०१४.
   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Crossredbu

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: तुझे भास पावसाचे. ..
« Reply #1 on: January 30, 2015, 10:44:13 AM »
Site Address and read it to know what to do.