Author Topic: स्त्री  (Read 1542 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
स्त्री
« on: March 08, 2015, 10:52:26 AM »
स्वामीनी तु आहेस
मर्दीनी तु आहेस
आई तु आहेस
जगतजननी तु आहेस...

सावलीची तु छाया
माऊलीची तु माया
पृथ्वीची तुझी काया
तुझविन सारे वाया...

जगाचा आधार तु
सुखाची चाहूल तु
विजयी प्रेरणा तु
आशेची किरण तु...

मानवजातीचा उगम तु
जिवनाचा आध्याय तु
वंदितो तुजला मी
दोन्ही कर जोडूनी...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता