सकाळीच तू तोडित असता जाईजुईच्या फुलां
माडीवरुनि सुंदर कन्ये, पाहियलें मी तुला
उंचविता कर छातीवरी ये चोळी तटतटुनी
कुरळ केश रुळताति गोरट्या मानेवरि सुटुनी
पदर खोवले पातळ गेलें कटितटिला लगटुनी
स्मृति सखये तव मनिं माझिया संगतिच्या उठुनी
बघसि चोरटे मी तुज दिसतो वरती का कुठुनी
दिसताचि मी हसू उषेसम मुखि तव ये फुटुनी
अशी सकाळी फुले तोडिता पाहियली जैं तुला
फुलवेलिहूनि तनुवेलची तव मोहक दिसली मला
( ? सावरकरांच्या कविता ? या काव्यसंग्रहातून साभार.)