एका रात्री.....
----------------------
धुंद झाला आज वारा
चंद्रही धरणीवर उतरला |
बघ सखे! तूझ्याचसाठी
चांदण्यांचा सेज सजला ||
धूसर झाल्या सर्व दिशा
चेहरा तुझा उजळला |
रातीपारी यौवन बघुनी
चंद्रकांत ही पाजळला ||
अश्विनीची ही तारका
डोळ्यात तुझ्या उतरली |
तिचीच ही सारी किमया
चोहीकडे पसरली ||
मंतरलेली ही रात्र
एका क्षणात संपली |
अलगद हळूच, माझी सखी
माझ्यापासून अंतरली ||
----------------------