Author Topic: अर्धांगिनी  (Read 1508 times)

Offline sanmay0105

  • Newbie
  • *
  • Posts: 2
अर्धांगिनी
« on: June 04, 2015, 06:04:45 PM »
मी पाहिलय ना आयांना
पोराला उघडं नागडं ठेवून स्वतःला नटताना।
आन पाहिलय तुला
पोरांना टिप टॉप ठेऊन
स्वतः फाटक्यात राहताना।

मी पाहिलय ना आयांना
अंगातले कपडे काढून
पोरांना भीक मागयला लावताना।
आन पाहिलय तुला
पोरान साठी ह्यांच्या त्याच्या कडं
पदर पसरताना।

मी पाहिलय ना आयांना
स्वतः आधी जेवून उरालेलं
पोरांना ठेवताना।
आन पाहिलय तुला
पोरांची पोटं भरून
स्वतः उपाशी झोपताना।

मी पाहिलय ना आयांना
रक्ताळलेलं पोर सोडून
स्वतःची साडी सांभाळताना।
आन पाहिलय तुला
स्वतःचा पदर फाडून
पोराची जखम झाकताना।
मी पाहिलय ना आयांना।
              सनी पगारे
              9769366302

Marathi Kavita : मराठी कविता