Author Topic: याला जीवन ऐसे नाव........  (Read 1642 times)

Offline Shirish Edekar

  • Newbie
  • *
  • Posts: 5
याला जीवन ऐसे नाव........
« on: June 12, 2015, 10:05:30 AM »
याला जीवन ऐसे नाव...
पहाट झाली, तांबड फुटलं, कोंबड आरवल,
शरीराला आळोखे-पिळोखे देत जागा झालो,
पहाटेच्या वाटेवरुनी सकाळ जागी झाली,
वाफाळलेल्या चहाने
दिवस सुरु झाल्याची जाणीव करून दिली,
उठ आता, तुझ्या चक्राची सुरवात झाली,
रोज तेच तेच काम करून सवईचा गुलाम झालो,
न्याहारी करता करता, बायको गोड-गोड बोलू लागली,
मला कळून चुकल, हिने टाकलाय गुगली, आता आपली विकेट गेली,
नवऱ्याची कामावर जायची वेळ, म्हणजे काहीतर मागण्याची वेळ,
ती काही बोलणार,
एव्हड्यात संध्याकाळी बोलू असे सांगून वेळ मारून नेली,
ट्रेनमध्ये रगडलो, ऑफिसात भरडलो,
तेच तेच काम, तीच तीच आकडेमोड
शेवटी एकदाची वाजली घंटी,
ऑफिसचा पसारा तसाच ठेऊन, मारली एकदाची कलटी,
परतीच्या वाटेवर, वाकुल्या दाखवत होते बिअरबारचे बोर्ड,
पाकिटात हात घातला तर त्याने डोळे वटारले,
चपटी तरी घेतो म्हणुन त्याला पटवलं
काल घेतलेल्या शपथेला तिलांजली देऊन
आज घेतली पिऊन,
बायकोने ओळ्खल, वेळपाहून तिने मागितलं
लेण तिच्या सौभाग्याच,
मी हो-नाही म्हणण्याच्या आत, तिने केला प्रेमाचा वर्षाव
हाच तर असतो परमोच्च आनंदाचा क्षण...
याला जीवन ऐसे नाव....

शिरीष/७-११   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rukdolphin

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: याला जीवन ऐसे नाव........
« Reply #1 on: September 14, 2015, 08:46:08 AM »
It is very good too. For the knowledge of good reading today.
แทงบอลออนไลน์
« Last Edit: June 06, 2016, 04:45:43 PM by rukdolphin »

Offline लंबोदर

  • Newbie
  • *
  • Posts: 1
Re: याला जीवन ऐसे नाव........
« Reply #2 on: October 19, 2015, 09:11:56 PM »
वा!

लंबोदर landbrother

  • Guest
Re: याला जीवन ऐसे नाव........
« Reply #3 on: October 19, 2015, 09:19:24 PM »
मराठी मराठी किती गाऊ तुझ्यासाठी,तुझ्यातच माझ्या जीवण गाठी।आसली जरी विदेशी दाटिवाटी तरी तुच माय मराठी!