ऋतू हिरवा हिरवा पानापानात साचला
धुंद होवून धारेने सदा पाचूचा घातला!
नभी उधळण झहाली निलशामल रंगाची
आली अवचित कानी साद वर्षासोहल्याची!
नाद कानात घुमला मत्त मयूरपंखांचा
अन काळही संपला चातकाचा प्रतेक्षेचा !
आसुसलेली धरीत्रीही प्रियतमाच्या भेटीला
रूप खुलवाया तिने साज हरिताचा ल्याला!
तिचा प्राणसखा आला रूप साजिरे घेवून
शुभ्र - धवल मोत्याची करी स्वैर उधळण!
अंती मिलन ते झाले दोन भिन्न - अभिन्नाचे
सृष्टी सृजन कराया दान दिले आनंदाचे !
प्राजक्ता ...