Author Topic: तेव्हा ती खुप आवडते  (Read 1671 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तेव्हा ती खुप आवडते
« on: September 05, 2015, 09:11:38 PM »
खरच तेव्हा ती खुप आवडते
जेव्हा ती मला पिल्लु म्हणुन मिरवते ,
स्वप्नच वाटते ति माझी असल्याची,
जेव्हा ती फक्त तुझीच बायको आहे म्हणते,
भास वाटण्याजोगा स्वभाव तिचा,
क्वचितच रागावते पण खर सांगू तर मला तेव्हा तिच हसू येतं.
चिडली कधी तर खुपच बेभान वाटते,
पण ती कधीच माझ्याशिवाय पूर्ण नसते.
तिच बोलण ऐकत राहावसच वाटतं,
नको बोलू म्हटलं तिला तरी तिच्यासोबत बोलावस वाटत.
भांडण्याची आपल्या आहे वेगळीच अदा,
उगाच जिद करुन पटवते तु मला सदा.

Marathi Kavita : मराठी कविता