Author Topic: चांदण मिठी  (Read 1246 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,276
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
चांदण मिठी
« on: October 12, 2015, 11:19:47 PM »
चांदण मिठी

श्वास स्पर्श तूझा हवा हवासा
शुभ्र मोगरी विखुरल्या कळ्यांचा !

केतकी तव तनु हलकेच थरथरे 
दरवळ जीवघेणा ओल्या कुंतलाचा !

हळुवार तलम सळसळ वस्त्रांची
धुंद मधुर रवं कंकण, पैंजणाचा !

कल्पनातीत तु प्रिये कल्पनेतली
सैलावु नको चांदण भास मिठीचा !

© शिवाजी सांगळे 🎭

Marathi Kavita : मराठी कविता