स्पर्शाची भाषा
सखे चांदण्यांचे…
कसे वार झाले
महेक मोग-याची…
जणू श्वास प्याले
शहारा हवासा…फुलला असा… की
मनातून उठली…किती वादळे
आतुर होऊन…
घेना जवळ
स्पर्शाची भाषा…
बोलते नजर
झुगारून दे ना….
रीती बंधने
मोहरून यावी…
मुकी पैंजणे
स्वत: सूर…. शब्दांवरी भाळले
मनातून उठली…किती वादळे
आभास नाही…
नसे स्वप्न ही
गळ्याभोवती…
घट्ट झाली मिठी
तुझ्यातून मी अन…
माझ्यात तू
बहरास ये…
भाववेडा ऋतू
शाहाण्यास ही वाटे व्हावे खुळे
मनातून उठली…किती वादळे
Author Unknown