रोखलेली नजर त्याची
रोखलेला श्वास मी
हात त्याने लावता
तो सोडला उच्छ्वास मी
धुंद या एकांतसमयी
घे प्रिया जवळी मला
नजर होती गुंफलेली
देह देही गुंफला
बहर आला यौवनाला
दशदिही गुंगती
शांत वारे,निद्रीस्त तारे
उसळून ये आणखी प्रिती
गाठला उच्चांक तरिही
जाणवेना तृप्तता
फिरुनी नवा तो जन्म अर्पे
ओसंडता तृषार्तता
शांत सारे,जागे व्हा रे
टिपुन घ्या ही शांतता
साक्ष व्हा या मिलनाची
आवेग ओसरुन संपता
हे खरे पुर्णत्व मिलन
पूर्ण ही संध्या खरी
स्वागतर्ह त्या नवजीवाच्या
वाजवी तोही बासरी...
-सौ. अक्षदा