तिच्या मंद श्वासात
गंध होऊन फुललेल्या
त्याच्या धुंद प्रेमाच्या आर्त सुरांशिवाय
दुसरा सुरच ठाऊक नसणा-या
तिच्या केसातल्या ओल्या वीणेवर
त्याच्या शापीत बोटांनी मोहाचा राग छेडला.
आणि मग....
तिच्या घायाळ पापण्यांनी बहरलेल्या
त्याच्या जखमी ओठात
अडकुन पडलेली बेभान परिस्थिती
पुन्हा एकदा बेईमान झाली....
मग पुन्हा एकदा
तो पावसाची सर होऊन
तिच्यावर बरसत राहीला....
..... तिचा श्वास फुलवत राहिला !
धुंद रवी.