इथे भेटल्या चान्द चान्दण्या
प्रीतिची एकतानता साधण्या
इथे भेटल्या चान्द चान्दण्या
आभाळाचा गहिरा डोह
वार्यालाही उधाणतेचा मोह
सारे आतुर सोहळा पहाण्या
इथे भेटल्या चान्द चान्दण्या
फूल निमन्त्रे खुळ्या भ्रमराला
सज्ज तोही वायुवेगे पळाला
अधीर तो कमलदलात मिटण्या
इथे भेटल्या चान्द चान्दण्या
नभाची त्या साद ऐकूनी
अवनीही उत्फुल धुन्द मनानी
आतुर ती नीळाईत बुडण्या
इथे भेटल्या चान्द चान्दण्या
तुझे नी माझे अतूट नाते
तुझ्याचसाठी जगणे हे माझे
नयनही ओले कुशीत मिटण्या
इथे भेटल्या चान्द चान्दण्या
Unknown