या धुन्दीत रे सखया
रात्र सारी जागते
रूपदर्पणी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते
शान्त जाहल्या चारी दिशा
तुझ्या इशार्याची चढली नशा
नयनामधली अबोल लाज
गुपित माझी सान्गते
रूपदर्पणी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते
हळव्या रेशमी तुझ्या पाशात
मन्द सूर तरन्गती मनात
म्रुदुल स्पर्शाच्या चान्दण्यात या
चिम्ब चिम्ब मी प्रकाश नहाते
रूपदर्पणी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते
उमलते उसासे श्वासही चढे
नको दुरावा मीलनाची आस जागे
अधीर मी अर्पण्या सर्वस्व ते
रूपदर्पणी तुला पाहता
मी मनोमनी बहरून येते
unknown