भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
नजर हाक देताच मी,
हसत उमटली लाज गाली.
वाटतो कि स्पर्श व्हावा,
पापणीचा पापणीला,
हितगुज ओठात व्हावे,
छेद द्यावा जाणीवेला.
स्पर्शाने जळलो त्या,
राख झाली मीपणाची,
आशेचा जळतो निखारा,
साचलेल्या राखेखाली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
ते न स्वप्न जे नीज देते,
स्वप्न ते जे कि जाग देते.
विझल्या निखारयातही,
पुन्हा नवीन आग देते.
आस उठते पुन्हा नवी कि,
नजरच मग प्रतिसाद देते.
कोमेजलेली हिरवी पाने,
पुन्हा टवटवीत झाली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
अक्षर ना ते वर्नाक्षरांत,
सूर ना तो साप्त्सुरांत,
तारा ना तो या नभात,
स्वप्न केवळ ते या लोचनात,
स्पर्श नको तो विजेचा,
मार्ग नको आडवाटेचा.
समागम झाला नवा हा,
निश्कामतेची ज्योत तेवली.
भाबडे सारे शब्द झाले,
अबोलात प्रीत न्हाली.
.................अमोल