वाट पाहतो मी चंद्र नभीचा
आसुसलेला तुझ्या प्रेमाचा
करतो अशी आर्त विनवणी
बनना तु माझी चांदणी...
रोज येते स्वप्नांमध्ये
येना आता जीवनामध्ये
एक एक क्षण तुझी आठवण
उजळत जाते माझ्या मनी...
बनना तु माझी चांदणी...
सागर माझा तु प्रितीचा
मी किनारा वेड्या मनाचा
मीच किनारी वाट पाहतो
लाट येईल माझी होऊनी...
बनना तु माझी चांदणी...
दाही दिशांना चाहुल लागली
माझ्या मनाला पंख ही फुटली...
उडत जाईल फिरत राहिल
तुझ्या प्रेमाच्या मी गगनी....
बनना तु माझी चांदणी...
-- सतिश चौधरी