हळु हळु विसावतो
स्पर्श तुझा देहावरी
ज़रा ज़रा सतावते
खोडी तुझ्या ओठावरी.
मंद मंद पेटती
दिवे खुळे अंतरी
बंध बंध खोलती
जादू रे तुझ्या करी.
कसे कसे शहराते
सुखावते कुशिवरी
जसे जसे उजाड़ते
लाजते मी थोडी.
पुन्हा पुन्हा साजना
असाच धुंद भेट ना
नको नको तुझ्याविना
रात मजला सोसेना.
- शशांक प्रतापवार