मन ओलाविले तुझ्या प्रेमाने
ओलावील्या राता...
तुझ्या प्रितीचे चांदणे घेऊन
शिंपीत ये आता ....
तुझे लाजणे हळवा पाऊस
तुझे पाहणे नटखट वारा
गाल गुलाबी झाले तुझे
रागावुन आता ……
मन हे माझे चालत गेले
तुज्या प्रितीच्या प्रेम वाटा
कसला हा बंध आहे तुझ्याशी
जणु रेशीमगाठा....
-- सतिश चौधरी