Author Topic: पावसाची रात्र नशीली  (Read 3297 times)

Offline Abhishek D

  • Jr. Member
  • **
  • Posts: 63
  • Gender: Male
पावसाची रात्र नशीली
« on: June 06, 2010, 02:46:50 AM »
पावसाची रात्र नशीली ... आणि हवास तू जवळी

धुंद व्हावे तन मन आपुले ... रिमझिम सरींच्या तालावरी


बेहोश व्हावे भिजूनी चिंब ...भान नसावे दोघांनाही

अलगद ओठांनी टिपावेस तू , थेंब माझ्या गालावरी


मिळता नजरेस नजर... ओठ थोडे थरथरावे ,

हात घेऊनी हातामध्ये, सारे जग विसरावे ...


रेशमी स्पर्शाने तुझ्या ... अंगअंग मोहरूनी यावे,

होऊनी रोमांचित दोघांनी, बाहूपाशात हरवावे ...


तुझ्या ऊबदार मिठीतली ... रात्र कधीच उलटू नये ,

विरहाचं ऊन पसरवणारी ... अशी सकाळ कधी येऊच नये !!!!!!!


unkwn
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Tanaji

  • Newbie
  • *
  • Posts: 10
Re: पावसाची रात्र नशीली
« Reply #1 on: June 16, 2010, 07:36:43 PM »
........विरहाचं ऊन पसरवणारी ... अशी सकाळ कधी येऊच नये
 
wah kya bat hai....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):