रातीच्या ह्या विराहग्नित, आज पुन्हा जळणार नाही
आज तुझ्या केसांत सखे, गजरा मी माळणार नाही...
अंतरंगाची साद प्रिये, शब्दरूपी बोलणार नाही...
अव्यक्त मम भाव तुला, आज सांगणार नाही...
आज तुझ्या केसांत सखे.......
ओझरत्या मोरपिशी स्पर्शांनी, आज सुखावणार नाही
तव जालीम उसासा देखील, आज मज छळणार नाही
आज तुझ्या केसांत सखे.......
श्वासातील वादळांना, सखे आज रोकणार नाही...
निखळू दे पाकळ्या अबोली, आज बंधन असणार नाही..
आज तुझ्या केसांत सखे......
तव रंगी हरवून आज, स्वरंग उरणार नाही....
लाजून दवडू नकोस वेळ, रात ही थांबणार नाही...
आज तुझ्या केसांत सखे....
भावनांना आज पुन्हा, नैतिकते सव तोलणार नाही
आज तुझ्या केसांत सखे, गजरा मी माळणार नाही...
-- पंकज
स्वरचित