पती पत्नीच्या काही सुखद पण गुपित आठवणी..........................
आज घातलीस तू साद मंजुळ स्वराने,
जुनीच प्रित छेडीते पुन्हा नवे तराणे.
जरी रुसलो जरी फसलो संसारसागरात,
विसरण्या होई सारे जेव्हा घेशी तू पदरात.
झाकशी चेहऱ्याची लाज आज त्याच पदराने.
हळूच सांगते कानी मी न राहिली तुझी,
तूच दिल्या गंधाने जाहली मी दुज्याची.
तुझाच अंश उमलवलला आज माझ्या उदराने.
या क्षणी काय वाटते कसे सांगू शब्दात,
काय करू नको करू या अश्या आनंदात.
मी घट्ट धरून घेतो तुझा कर माझ्या कराने.
तू मोहरलीस नव्याने मी हि न राहिलो जुना,
इथून सुरु होतील नव्याने आपल्या पाऊलखुणा,
सुने अंगण उजाडेल लेकराच्या पावलाने.
......अमोल