नेत्रांच्या या श्रावण धारेत,
गाल गुलाबी भिजले गं !!
त्या गालांच्या खळीत मोहक,
सुंदर हास्य रुजले गं !!
काळ्याभोर घनात केसांच्या,
मन निवांत निजले गं !!
तेव्हा ओठांच्या गुलाब पंखुड्या,
कानी काही कुजबुजले गं !!
स्पर्शन्या तो ऊर सोनेरी,
कंपित कर धजले गं !!
चांदण्या उन्हात कोवळ्या,
शृंगार क्षण सजले गं !!
दोन निर्मळ जिवांनी तेव्हा,
एकमेकांचे जीव पिंजले गं !!
श्वासांच्या लयीत भिजुनी,
मदन कामिनी थिजले गं !!
...............अमोल