Author Topic: अशीच यावी वेळ एकदा ध्यानी मनी नसताना  (Read 2369 times)

Offline prachidesai

  • Jr. Member
  • **
  • Posts: 117
  • Gender: Female

अशीच यावी वेळ एकदा ध्यानी मनी नसताना
असे घडावे अवचित काही
तुझ्या समीप मी असताना
अशाच एका संध्या काळी
एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चित्त पाखरू
केवळ तुझी नि माझी जवळीक
संकोचाचे रेशम पडदे
हा हा म्हणता वेहून जावे
समय सर्व मंद गतीने
आणि प्रीतीचे सूर जुळावे
मी मागावे तुझिया पाशी
असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको तू हवे असताना
शब्द वाचून तुला कळावे
बूज मनी या लपलेले
मुक्त पाने तू उधळून द्यावे
जन्म भारी जे जपलेले
--
unknown