लाडके गाल थरथरले आज
चुंबनांचे हलके गाज
नशा उसळेल प्रितीची अन
श्वासांमधे भिनतील श्वास
चेहरा तुझा ओंजळीत
स्वर्गच जणु झोळीत
दोघांमधे अंतर शुन्य
प्रणयाच्या स्पर्शाची आस
बंधने सुटतील जगाची
ओठांवर भाषा ओठांची
गंध तुझ्या त्या श्वासांचा
सत्य म्हणू की सुवर्ण भास
मोगरा झुरतो वेणीशी
रातराणी अंगणाशी
सारे गंध फिकेच आज
दरवळतो तुझा सुवास
देह विखुरले देहात
गुज कोठले डोळ्यात ?
पुरे जरीही वाटत असले
सोडवु नको हा समास ..
...unknown