Author Topic: काहीतरी चुकलेले.  (Read 2196 times)

Offline pralhad.dudhal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 118
  • Gender: Male
काहीतरी चुकलेले.
« on: January 06, 2011, 07:59:34 PM »
काहीतरी चुकलेले.
 
भासते ते काहीतरी चुकलेले.
तोंड तुझे असे का ग सुकलेले?
 
रंग नेहमीचा तो आज का नाही?
काय नजरेत माझ्या खुपलेले.
 
ताठा  नेहमीचा तो आज कुठे ग,
फुल कुंतलावर ते सुकलेले.
 
लगबग नेहमीची ती दिसेना,
रेशमी कापड चुरगळलेले.
 
रागाऊ नकोस अशी सखये ग,
गाव तुजसाठी चुकचुकलेले.
 
              प्रल्हाद दुधाळ.
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline amoul

  • Full Member
  • ***
  • Posts: 654
  • Gender: Male
  • tAKE iT eASY
Re: काहीतरी चुकलेले.
« Reply #1 on: January 07, 2011, 10:51:53 AM »
kiti chhan kavita aahe ! kharach!!