• II ओम साई II
तो म्हणजे कवी
जो बुद्धी तोकडी व मन प्रबळ मानतो,तो मन्मान्या म्हणजे कवी,
जो धन-व्यवहारापेक्षा,भावना मुल्यांची तिजोरी जपतो,तो व्यापारी म्हणजे कवी ,
जो जन दृष्ट्या शून्यात पण,अंतर्मुखाने सर्व मनात विसावतो,ती तंद्री म्हणजे कवी ,
जो जन जत्थ्यात एकटा असून सर्व लोकांना स्वभावात निरीक्षित करतो,ती दुर्बीण म्हणजे कवी,
जो हरेक भावनांचे जाळे विणतो,ती कातण म्हणजे कवी,
जो हेच जाळे सहजपणे उसवतो,तो किडा म्हणजे कवी;
जो थेम्बित भावनांची काव्यधार खळखळवतो,तो धबधबा म्हणजे कवी,
जो कंच हिरवळीतहि,उदासीनतेची वाळू निसटवतो,तो वाळवंट म्हणजे कवी,
जो हृदयी भावनिक बोच टोचावतो,तो काटा म्हणजे कवी;
जो स्म्वेदनिक रित्या कोणालाच समजत नाही,तो हतबल म्हणजे कवी,
जो हृदय भावनांना श्वासवतो,तो प्राणवायू म्हणजे कवी,
जो शब्द मखमलीतून स्वतःस अंथरतो,तो गालीचा म्हणजे कवी,
जो मैफिलीतही हरवलेला असतो,तो बेपत्ता म्हणजे कवी,
जो शब्द शृंगारात काव्य रंगवतो,तो मदन म्हणजे कवी,
जो काव्यरुपी संतती जन्मावतो,तो त्राता म्हणजे कवी,
जो पानगळीत जीवाला,पल्लवित करतो,तो वसंत म्हणजे कवी,
जो प्रेम विरहालाही मिलनीत करतो,तो प्रियकर म्हणजे कवी,
जो स्थूल देही हरवून सूक्ष्म देहीच जगतो,तो वेडा म्हणजे कवी,
जो शब्द पुष्पांनीच ब्रम्हास्मित होतो,तो निर्वाण भक्तं म्हणजे कवी.
जो काव्यनादानी प्राणायमित होतो,तो ओंकार म्हणजे कवी.
चारुदत्त अघोर (दि.१६/१/११)