ओम साई
‘ती सकाळ’
ती गच्चीतली चांदणी रात्र पडायला,
होती सोबतीस तू,मला झोपी थापडायला;
पहाटे न्हाल्या अंगाने तू आलीस,पण पाहून मीच भिजून चीम्बला,
तुझ्या केस झटक्याने,जसा अंगी सडाच शिंपला;
ढिल्या अंगी तू वाकलीस जवळ,सावरत स्वतःस पदरी,
ढिलावून केसी निसटून,एक बट गुदगुदली स्पर्शून माझ्या अधरी;
ओठ चिमटा करून तीस,मी तुला ओढले छाती,
शरणांगत होऊन तू मुठावलेस,तुझे हात माझ्या हाती;
पुढे काय झालं,लक्षात का आहे खूण,त्या चावल्या दातांची,
अझुनही लाजवतेस चेहेरा,घेऊन ओंझळ त्या गुलाबी हातांची;
किती तशीच आज भासलीस,का मला पुन्हा मागे पाठवते?
कदाचित तू विसरलीस,पण मला ‘ती सकाळ’ अजून आठवते...!!!!!
चारुदत्त अघोर.(दि.३/२/११)