रंगे महालात रे सख्या ध्यानात रे
लाजून कस कस हसू
मनात बावरी तना ला सावरी
कशाला मी रे फसू
रंगे महालात रे प्राण श्वासात रे
वाट मी किती तुझी बघू
सख्याची चाहूल जीव हा व्याकूळ
वाकून बघते हळू
रंगे महालात रे प्रेम मनात रे
कविता बोडस
धीर मी कुठवर धरू
पावसाने झाली चोळी हि ओली
पदर लागला ढळू
रंगे महालात रे कशी झोकात रे
ज्वानी हि चालली उतू
घायाळ नजर बोलण मधाळ
वसंत लागला ऋतू
[/b]कविता बोडस [/b]