ॐ साईं
वाट गवसेल का…..?चारुदत्त अघोर.
भरकटले मन माझे,जरा स्थिरावेल का?
अधीर उत्सुकता माझी,थोडी धीरावेल का?
विचारात एक अंधुकशी छवी,जरा स्पष्टावेल का?
एक आद्य प्रराम्भित कहाणी,पूर्ण गोष्टावेल का?
एकंच ती स्वर ओळ,कधी गाणवेल का?
आसुस नजर माझी,जरा पाणवेल का?
रोमांचित अंगावले काटे,कधी संथावतील का?
सुचले चार ओळीत काव्य,कधी ग्रंथावतील का?
जी मनी प्रवासते ती खरंच,अस्तित्वात असेल का?
नकळत डोळे झाकून,भिजल्या पापण्या पुसेल का?
मोगर्या गंधित वेणीत केस,मोकळे पसरेल का?
मला सावली देण्यास, ते वाकून घसरेल का?
सरळ मला डोकावून मांडीत,स्वतः उलटी वाकेल का?
अधीर श्वासीत नाक शेंडा,माझ्या नाकी नाकेल का?
मिटल्या पापण्यांना,नखी तारावेल का?
एक आगळीच रसना,अंगी धारावेल का?
थरथरत्या ओठी ओठ अधरून,कुलुपवेल का?
शिथिलपणी शांत पारा,चढवून तपवेल का?
वाढती धडधड हृदयी,हाथ ठेवून थांबवेल का?
बेभान बरसत्या शृंगारीत धारी,चीम्बवेल का?
ह्या स्वप्नातून मला जागवायला,ती हलवेल का?
काल्पनिकता ती नाही,हा भ्रम घालवेल का?
अशीच प्रणयीत बरस, सतत विचारी पावसेल का?
मनीची सुप्त दिसती वाट हि,खरंच मजला गवसेल का…..?
चारुदत्त अघोर.(६/५/११)