मधाळ रात्र मदहोश मी ,
बाहुपाशात तुझ्या,
तुझ्या केसांचा गालीचा , भोवताली माझ्या,
मखमली स्पर्श जणू मोत्यांचा,
घट्ट बिलगून घेणाऱ्या हळुवार हातांचा, .
माझ्या डोळ्यांना तुझ्या डोळ्यांचा होकार,
मी अल्लड उतावळा , तू अलगद हळुवार,
सुरु व्हावा प्रवास कधी न संपणारा,
डोळ्यांनी सुरु होऊन , काळजा पर्यंत भिडणारा .
मैत्रेय