ती हिरकणी मनमोहिनी
तिजसारखे नाही कुणी
पाहु नका तिजला कुणी
माझीच ती मनकामिनी
ती हिरकणी.......
नयनी तिच्या सुखस्वप्न हे
मुखचंद्रमा गाली हसे
नाजूक ती आहे अशी
चाले जशी गजगामिनी
ती हिरकणी......
केसात सोनेरी छटा
गालावरी रुळती बटा
चाफेकळी ती लाजरी
माझ्या सुरांची रागिणी
ती हिरकणी....
ओठांवरी गुलकंद हा
श्वासांमध्ये निशिगंध हा
इंदरघरीची अप्सरा
उतरून आली भूवरी
ती हिरकणी......
............................................अमोल कशेळकर