तुझा फुलारला देह
त्याला ज्वानीचा सुगंध
राणी खुणाविते मला
...
तुझी प्रीत ही मधाळ
माझ्या मनाच पाखरू
त्याला फुलोर्याची भूल
साद घालते ग त्याला
तुझ्या प्रीतीचे हे फूल
तुझ्या ज्वानीचा सुगंधं
त्याने पाखरू वेडावल
तुझी बहरली देहलता
तिने पाखराला भुलवल
माझ मन हे पाखरू
त्याच प्रेमही नाजुक
तुझी झुलव देहलता
येईल जवळ आपसूक