हे क्षण नाजूक हेच क्षण अनमोल,
इथेच जपायचा नेमका तू आणि मी समतोल.
इथेच नाही राहायचे, यातच नाही वहायचे,
हा नाही मुक्काम आपला इथून पुढे जायचे.
संसाराच्या लक्ष्यांवरलं हा विश्रांतीचा पढाव आहे,
इथून फार लांब गाठायचे गाव आहे.
पण इथेच एकमेकांना जाणायचे सखोल.
इथे उलगडायची एकमेकांची मनं,
नाजुकश्या या वळणावर विसरायचे नाभान.
आदर असू द्यावा एकमेकांच्या भावनेचा,
संसारात शिरतांना या संसारी कामनेचा.
स्पर्श होतात बोलके ओठ जरी अबोल.
इथेच ठरवायच्या एकमेकांच्या मर्यादा,
आणि शपथ घ्यायची ती जपण्याची सदा.
हे पवित्र मिलन जरी बंद अंधारात,
संसार खुलावा विश्वासाच्या प्रकाशात.
अति प्रसंगातही टिकावी हि नात्याची ओल.
एकमेकांचा एकमेकांवर जरी आहे अधिकार,
तरी स्वातंत्र्य असावे दर्शविण्या नकार.
ओढतानाने होऊ नये हा समागम,
निखळ आनंदात पार पडावा हा शरीराचा संगम.
हि रात्र मनात रुजावी खोलखोल.
................अमोल