Author Topic: गाली तुझ्या....  (Read 9584 times)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
गाली तुझ्या....
« on: April 24, 2012, 11:26:33 AM »
गाली तुझ्या....

गाली तुझ्या खळी कशी
श्वास माझे अडकले

केस तुझे सखे जणू
रेशमांनी विणलेले

डाळिंबी ओठ तुझे
रसरशीत फुललेले

नेत्र तुझे हरिणीचे
स्वप्नातच दंगलेले

कांती तुझी नव्हाळीची
केतकीचे बन फुले

निमूळती बोटे तुझी
चित्र कुणी रेखियले

वळसे देहाचे खास
नेमकेच उमटविले

कोवळा गं बांधा हा
जाईची ती वेल झुले

चाल तुझी हंसगती
पाहूनी गं मन भरले

दिसशी तू मूर्तिमंत
काव्यचि ते बहरले

सारखी तू दृष्टिपुढे
मन वेडे खुळावले

तुझ्याविना सुचेना गं
जीव कसा तळमळे


-shashank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: गाली तुझ्या....
« Reply #1 on: April 25, 2012, 10:36:58 AM »
shashankji..... kya khub kavita likhi hai..... ekdam dolyapudhe sundrich awtarli..... gr8

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: गाली तुझ्या....
« Reply #2 on: April 27, 2012, 04:41:39 PM »
good one!!! :)

Re: गाली तुझ्या....
« Reply #3 on: April 30, 2012, 04:28:11 PM »
nice 1!!  :)

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: गाली तुझ्या....
« Reply #4 on: May 11, 2012, 02:09:09 PM »
सर्वांचे मनापासून आभार....., असाच लोभ असू द्यात......
« Last Edit: May 11, 2012, 02:09:37 PM by shashaank »

Offline snehal bhosale

 • Newbie
 • *
 • Posts: 32
Re: गाली तुझ्या....
« Reply #5 on: May 11, 2012, 05:17:52 PM »
NICE :)

Re: गाली तुझ्या....
« Reply #6 on: May 12, 2012, 11:18:02 AM »
very nice :)

Re: गाली तुझ्या....
« Reply #7 on: May 15, 2012, 09:56:37 AM »
खूपच सुंदर शशांकजी .... असे  वाटले अरण्यात कुठे हरवलो आणि वाट शोधता शोधता स्वर्गातली परी भेटली जिची स्तुती  तुंम्ही करत आहात ....अशी कधी मिळेल कि नाही माहित नाही पण हो स्वप्न तर पाहू शकतोच ....
धन्यवाद !!

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: गाली तुझ्या....
« Reply #8 on: May 15, 2012, 04:03:08 PM »
सर्वांचे मनापासून आभार....., असाच लोभ असू द्यात......

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: गाली तुझ्या....
« Reply #9 on: September 03, 2012, 05:39:49 PM »
Mast kavita ahe...awadali