Author Topic: सौंदर्य......  (Read 4267 times)

Offline janki.das

  • Jr. Member
  • **
  • Posts: 76
सौंदर्य......
« on: May 07, 2012, 05:56:19 PM »
तशी ती खूप लाघवी आहे
तिचं सौंदर्य मात्रं पाशवी आहे

धनुष्याच्या भुवया आणि हरणाचे डोळे
पाठीवर लांबसडक नागिण सदा डोले

गुब-या गुब-या गालावर सफरचंदी रंग
मी चंद्रगोल चेहरा पाहण्यातच् दंग

धारधार नाकावर चमकीचा हिरा
नाजूकश्या जिवणीवर कायम पहारा

लांबसडक हात आणि जीवघेणी मान
पाठीवळून पहाते तेंव्हा, पेटतं सारं रान

गो-यापान दंडावर बाजूबंद रुतलेला
हिरव्या काकणांनी हात कसा सजलेला

मखमली पोटाला कमरबंध चिकटला
नुसतं स्पर्शून वारा सुद्धा भरकटला

मंदमंद वेग तिचा, मोरासारखी चाल
बघणा-या जिवाचे, अतोनात हाल

तिच्या पायातले पैंजण छुमछुम गातात
कोकिळेचे स्वर सा-या रानात उमटतात

जसा तप्तं लाव्हा, तसा देह तिचा सारा
त्यात उमलत्या वयाला मदनाचा वारा

जयंत विद्वांस

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: सौंदर्य......
« Reply #1 on: May 08, 2012, 03:37:05 PM »
khup chan kavita....