Author Topic: कशी नशिबाने थट्टा आज मांडली !!!  (Read 3830 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...


चित्रपट :- पिंजरा
गीत :- कशी नशिबाने थट्टा
गायक :- सुधीर फडके

दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव
सुखी समाधानी होता, रंक आणि राव
त्याची गुणगौरवान कीर्ती वाढली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोव-यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्रा मांजराची दशा आणली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

जन्मभरी फसगत झाली तिचा हा तमाशा
जुळूनिया गेली आता जगायची आशा
आज हुंदक्यान भैरवी मी गायली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !
याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशिबाने थट्टा आज मांडली !

« Last Edit: July 11, 2010, 08:40:58 PM by rkumbhar »


Offline Kiran Mandake

  • Newbie
  • *
  • Posts: 40
  • Gender: Male
मी जेव्हा पुण्यात आलो तेव्हा जे शिक्षण घेत होतो तेव्हा हे गाणे आवडायचे एकदम बरोबर होते माझ्या व्यवसायाबरोबर
 :'( :'(

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):