Author Topic: कशी नशीबाने थट्टा आजमांडली ! चित्रपट : पिंजरा (१९७७)  (Read 3655 times)

Offline अमोल कांबळे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 100
  • Gender: Male
  • मी माझा मैत्रेय!
    • मी माझा मैत्रेय!
सत्वशील
चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला,
नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज
मांडली ! ॥३॥
पिसाळलेल्या नागिणीने
थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गावं
येडा झाला
त्यांनी लाज भीड
निती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज
मांडली ! ॥४॥
जाब विचाराया गेला, तिनं
केला डाव
भोवयात
शृंगाराच्या सापडली नावं
त्याच्या पतंगाची दोरी तिनं
तोडली
कशी नशीबाने थट्टा आज
मांडली ! ॥५॥
खुळ्या जीवा कळला नाही खोटा तिचा खेळ,
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई
तोल,
त्याला कुत्र्या-
मांजराची दशा आळली
कशी नशीबाने थट्टा आज
मांडली ! ॥६॥
जन्मभरी फसगत झाली,
तिचा हा तमाशा,
जळूनिया गेली आता,
जगायची आशा,
आज हुंदक्यानं भैरवी मी गाईली
कशी नशीबाने थट्टा आज
मांडली ! ॥७॥
याची देही याची डोळा पाहिले
मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले
सरण
माझ्या कर्म
सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज
मांडली ! ॥८॥
गायक : सुधीर फडके
गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : राम कदम
चित्रपट : पिंजरा (१९७७)


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):