Author Topic: हा माझा मार्ग एकला !  (Read 1086 times)

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
हा माझा मार्ग एकला !
« on: December 29, 2009, 01:06:30 PM »
हा माझा मार्ग एकला !
शिणलो तरिही चालणे मला

दिसले सुख तो लपले फिरुनी
उरले नशिबी झुरणे दुरुनी
बघता बघता खेळ संपला !

सरले रडणे उरले हसणे
भवती रचितो भलती व्यसने
विझवू बघतो जाळ आतला !

जगतो अजुनी जगणे म्हणुनी
जपतो जखमा हृदयी हसुनी
छळते अजुनी स्वप्न ते मला !
 
 
गीत    -    शांता शेळके
संगीत    -    सुधीर फडके
स्वर    -    सुधीर फडके
चित्रपट    - हा माझा मार्ग एकला (१९६३)

Marathi Kavita : मराठी कविता