प्याराशूट सोडणारी आणि पतंग उडवणारी
लापाछापित लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी
तुला पाहून लाजणारी
आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतः पहिले झेलणारी
गच्ची
येरे ये पावसा जीव झाला वेडापिसा
सरीच्या परी तू ये ना जरा
गच्ची चा कोपरा छेडतो
गार वाराओल्या त्या थेंब परी डे शहारा
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या सांग ना
भिजलेल्या साडी मध्ये चोख दिसते
आज मला पुन्हा भिजावेसे वाटते
गच्ची वरून ..............कशी .....दिसते
आज मला तिला पाहावेसे वाटते
मित्रांच्या पार्ट्यांमध्ये आणि थंडीच्या गारठ्यांमध्ये
सगळी कडे तूच दिसतेस आणि जग खूप छोट दिसत,त्यात तू नसते
साला ब्ल्यांकेट पण खूप मोठ वाटत
आली हि थंडी गुलाबी ईइ ईइ गुलाबी
त्यात हि गच्ची शराबी
एकट्यात भेट जरा अशी जराशी
नजरेत भीती कशाची
हो भेट तुझी थेट दिलाशी
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या सांग ना आआआ
थंडीतल्या चादरीत जवळ भासते
हली मला रोज कोज कोजी वाटते
गच्ची वरून ..............कशी .....दिसते
आज मला तिला पाहावेसे वाटते
आता दिवसा गच्चीवर उन्हे खेळून खेळून दमतात
आणि रात्री झोपायला माणसच माणस जमतात
तरीही तुझ्या खिडकीवर नजरेची शाळा भरलेली असते
आणि झोपेने मात्र उन्हाळ्याची सुट्टी मारलेली असते
आला उन्हाळा आला unhala गेला हिवाळा गेला हिवाळा
हि गर्मी हरामी
स्पर्श तुझा हवा हवा
उन्हातल्या मनातल्या अंधारात या
सखे तूच काजवा
फोटो तुझा माझ्या उशाशी
पाहता तुला झाल्या धुंद दिशा कश्या सांग ना
रात्री चांदण्यात लुका लुक करते
तुला आठून निजावेसे वाटते
गच्ची वरून ..............कशी .....दिसते
आज मला तिला पाहावेसे वाटते
कृपया मध्ये खिडकी आणि मस्त या जागा भराव्यात .
SAY THE BAND