Author Topic: *****मोरया मोरया*****  (Read 1594 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
*****मोरया मोरया*****
« on: November 26, 2009, 01:24:06 AM »


चित्रपट :- उलाढाल (२००९)
गायक :- अजय
गीतकार :- जगदीश खेबुडकर
     *****मोरया मोरया*****
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना माणसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिन्दराची माया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया.....

ओम्काराचं रूप तुझं चराचरा मंदी
झाड येली पाना संग फुल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती- तुझी शक्ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिन्दाराची  माया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया.....

आदी अंत तुचं खरा तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाज दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिन्दाराची माया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया.....
गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया
मोरया.....मोरया.....मोरया.....मोरया.....
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाने
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी


Marathi Kavita : मराठी कविता