Author Topic: ***Eagles Hotel California in मराठी (वाचाच!!)***  (Read 3456 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
हे एक असं गाणं आहे की ज्यात music, lyrics सगळं सगळं जुळून आलंय...
ह्या गाण्यात गोष्ट आहे, अलंकार आहे, गूढ अर्थ आहे.. जरूर ऐका
[जबरदस्त music ने सुरुवात]

वाळवंटातल्या अंधाऱ्या मार्गावर [चालत असताना]
माझ्या केसात थंड वारा [वाहत होता]
उबदार असा मारिजुआना झाडाचा वास
सगळ्या हवेत पसरत चालला होता
आणि समोरच थोड्या अंतरावर
मी एक मिनामिणणारा कंदील पाहिला
माझं डोकं चढत गेलं आणि दृष्टी अंधुक होत गेली
मग मला त्या रात्रीपुरतं थांबावं लागलं
त्या तिथे दरवाजातच ती उभी होती
मागे मी मंजुळ घंटा ऐकली
आणि मग मी स्वतःशीच विचार करत होतो
हा स्वर्ग तरी असेल किंवा नरक तरी
मग तिने एक मेणबत्ती पेटवली
आणि तिने मला रस्ता दाखवला
तिथे त्या galary  खाली कसलेतरी आवाज चालले होते
मला वाटतंय मी त्यांना असं म्हणताना ऐकलं की
Welcome to the Hotel California
काय मस्त ठिकाण आहे
वाह मस्त ठिकाण..
वाह काय मस्त चेहरे पण
पुष्कळ अश्या खोल्या आहेत Hotel California त
वर्षाच्या कोणत्याही दिवशी
अगदी कोणत्याही दिवशी
तुम्हाला इथे हे असेच दृश्य सापडेल
 
तिचा मन हे आतल्या गाठीचं होतं
तिला Mercedes Benz  मिळालेली होती
तिच्या आसपास बरीच तरुण मुले असायची
आणि ती त्यांना मित्र म्हणायची
ते अंगणात नाचत तरी कसे होते
जिथे मस्त उन्हालाही घाम फुटत होता
काही नाच हा लक्षात राहण्यासारखा होता
आणि काही नाच विसरण्याजोगा

आणि मग मी वेटर(captain) ला बोलावलं
[आणि म्हणालो] please माझी तेवढी wine आणा
तो म्हणाला
आमच्याकडे ती दारू १९६९ पासून नाहीये
आणि अजूनसुद्धा ते आवाज फार लांबून बोलावत होते
आणि मध्यरात्री झोपेतून तुम्हाला उठवत होते
फक्त तुम्ही हेच ऐकण्यासाठी की
 
Welcome to the Hotel California
Such a lovely Place
Such a lovely Place (background)
Such a lovely face
ते सर्वजण Hotel California  मधेच राहत होते
काय आश्चर्य आहे
खरंच..  काय आश्चर्य आहे
तुमच्या पण काही सबबी आणा [इथे राहण्यासाठीच्या..]
 
छताला आरशे लावलेले होते
बर्फात गुलाबी champagne होती
आणि ती म्हणाली
इथे आपण सर्व कैदी आहोत
आपल्याच खेळण्याचे
आणि त्या मोठ्या खोलीमध्ये
ते मेजवानीसाठी जमलेले होते
त्यांच्याकडच्या धारदार चाकूने ते मांस कापू शकले असते
पण त्यांना कापायची माहितीच न्हवती
शेवटची गोष्ट मला आठवतीये
मी दरवाजाच्या दिशेने पळत होतो
मला तो मागचा मार्ग शोधायचा होता जिथे मी आधी होतो
"निवांत हो" तो पहारेकरी म्हणाला
आम्हाला इथे आत घेण्यासाठी नेमण्यात आलंय
तुम्ही कधीही येऊन पाहिजे त्या वेळी याची खात्री करू शकता
पण तुम्ही इथून जाऊ शकत नाही!!!
 
- रोहित (You'll find it @ www.mp3skull.com very easily)
 
« Last Edit: December 10, 2011, 01:48:51 AM by Rohit Dhage »


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):