Author Topic: कंठातूनी लक्ष्य हुंकार झणकारुनी, होऊ द्या   (Read 1079 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...


चित्रपट :-  मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
गायक :- अजित परब, हृषीकेश कामेरकर, नेहा राजपाल.
संगीत:-अजित-अतुल-समीर,  गीतकार:-श्रीरंग गोडबोले  
*****************************************
कंठातूनी लक्ष्य हुंकार झणकारुनी, होऊ द्या गर्जना
आकाश भेदुया जयघोष हा करुनी, देऊ या वंदना
मराठी मातीला मर्दाच्या मातेला, देई आम्हाला जी प्रेरणा
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा-नसांत चेतना
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हो महाराष्ट्र देशा
ओ.....स्स्स ||धृ||

दोस्तीमध्ये दोस्त आम्ही, देऊ प्राणांचीही कुर्बानी
गद्दार त्या दुष्मनांचा
करू निपात अन पाजू पाणी
मी मराठी हो..हो..जो म्हणे तो हो...हो...
भाऊ रक्ताचा होऊन गेला
दिलदारी हो...हो...मी मराठी हो...हो...
आपले मानू तो आपलाच झाला
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा-नसांत चेतना
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हो महाराष्ट्र देशा
ओ.....स्स्स ||१||

जात्यावारती गात ओवी, उरी सांभाळी मायमराठी
संस्कार हे शिक्षणाचे, करी पिढ्यान-पिढ्यांवर ही ती
अभिमानी हो...हो..स्वाभिमानी हो..हो
घेतले ही कधी खड्ग हाती
नव्या दारी हो...हो....सबला...ही हो..हो..
जिंकुनी हे सारे जग जाई
अंगार हा फुटे नेत्रातूनी नसा-नसांत चेतना
कल्लोळ हा उठे देहातुनी जय हो महाराष्ट्र देशा
ओ.....स्स्स ||२||