मी पावसाचं स्वप्न पाहिलंय..
मी बागेचं स्वप्न पाहिलंय या वाळवंटातल्या रेतीत
मी व्यर्थच जागा झालोय
मी प्रेमाचं स्वप्न पाहिलंय कारण वेळ माझ्या हातून निसटत चाललीये
मी ज्वाळेचं स्वप्न पाहिलंय
आणि ती स्वप्नं एका अश्वाला बांधलीयेत जो कधीच थकणार नाहीये
आणि त्या ज्योतीमध्ये
तिची सावली पुरुषाच्या अभिलाषेत खेळते
हे जे वाळवंटातलं गुलाब आहे
त्याची प्रत्येक एक पाकळी, एक गुपित शपथ आहे
हे जे वाळवंटातलं फुल आहे
कुठल्याही गोड अत्तरांनी मला आजवर एवढं छळलं नाही
आणि जशी ती वळते
ह्याच पद्धतीने ती माझ्या स्वप्नातल्या तर्कात घुसते
ही आग जशी जळतच चाललीये
तसं मला उलगडत जातं जे दिसतं तसं ते नसतं
मी पावसाचं स्वप्न पाहिलंय..
मी बागेचं स्वप्न पाहिलंय या वाळवंटातल्या रेतीत
मी व्यर्थच जागा झालोय
मी प्रेमाचं स्वप्न पाहिलंय कारण वेळ माझ्या हातून निसटत चाललीये
मी पावसाचं स्वप्न पाहिलंय..
मी माझ्या नजरा वर मोकळ्या आकाशी उंचावतो
मी माझे डोळे बंद करतो
हा दुर्मिळ वास तिच्या प्रेमाच्या गोड नशेचा आहे
हे गोड वाळवंटातलं गुलाब
त्याची प्रत्येक एक पाकळी, एक गुपित शपथ आहे
हे जे वाळवंटातलं फुल आहे
कुठल्याही गोड अत्तरांनी मला आजवर एवढं छळलं नाही
हे गोड वाळवंटातलं गुलाब
ही स्वर्गाची आठवण आम्हा सर्वांवर सत्ता करते
हे जे वाळवंटातलं फुल आहे
हा दुर्मिळ वास, विरून जाणाऱ्या गोड नशेचा आहे
- रोहित
Find the song @
www.mp3skull.com