Author Topic: Request सरीवर सरी आल्या ग .. सचैल गोपी न्हाल्या ग  (Read 2575 times)

Offline swapnaja

  • Newbie
  • *
  • Posts: 1
प्लीज , कविवर्य बा भ बोरकर यांची "सरीवर सरी आल्या ग.. सचैल गोपी न्हाल्या ग " हि कविता पोस्ट करावी


Padmaja Vaidya

  • Guest
सरिंवर सरी आल्या ग

सरिंवर सरी आल्या ग
सचैल गोपी न्हाल्या ग

गोपी झाल्या भिजून-चिंब
थरथर कापती निंब-कदंब
घनांमनांतुन टाळ-मृदंग
तनूंत वाजवी चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या ग
सरिंवर सरी आल्या ग

मल्हाराची जळांत धून
वीज नाचते अधुनमधून
वनांत गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पावा सांग कुठून?
कृष्ण कसा न उमटे अजून?
वेळी ऋतुमति झाल्या ग
सरिंवर सरी आल्या ग

हंबर अंबर वारा ग
गोपी दुधाच्या धारा ग
दुधात गोकुळ जाय बुडून
अजून आहे कृष्ण दडून
मी-तू-पण सारे विसरून
आपणही जाऊ मिसळून
सरिंवर सरी आल्या ग
दुधात न्हाणुनि धाल्या ग
सरिंवर सरी : सरिंवर सरी....

__ बा. भ. बोरकर

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):