Author Topic: आला थंडीचा महिना  (Read 2555 times)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
आला थंडीचा महिना
« on: February 18, 2013, 11:24:01 AM »
 मधुरा Thank you!
 
तू पाठवलेल्या vidio clip वरून मी शब्द लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. पण ३ ओळी लिहिता आल्या नाहीत कारण recording खराब झालं आहे. कोणाला ह्या ओळी माहित असतील तर please मला कळवा. मी update करीन. तसेच काही ओळी चुकल्या असल्यास कृपया सांगा म्हणजे त्या सुधारून लिहिता येतील.


केदार...
 
 
आला थंडीचा महिना
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला
मधाचं बोट कुनी चाखवा

कोवळ्या मनातं इनलय
नाजूक पिरतीच जाळं
काही सुचंना बाई मी
करतेया भलतंच चाळं
रोज सपनात येतंय
********************
त्याच्या साथींनी मांडलाय
***********************
झोप लागं ना बाई गं 
झोप लागं ना बाई गं   
सख्याला निरोप पाठवा   
मला लागलाय खोकला

तुमच्या साठीचं आले
मोडून माझं मी लग्न
द्या सोडून घर दार
चला जी माझ्या मागनं
असं किती चालायचं
नुस्तच दुरून बघणं
तुमच्या वाचुन झालया
मला बी अवघड जगणं
लै वाढलया दुखणं
लै वाढलया दुखणं
खात्रीचा हकीम मागवा
मला लागलाय खोकला

मोठा दिसतो पावणं
किती तुला सांगावं
घ्या पुढ्यात मजला
प्रेमानं कुरवाळा वो
पाया पडते मी तुमच्या
थोडंसं ऐकाल का वो
****************************
*****************************
कसं मायेचं पाखरू
कसं मायेचं पाखरू
झोपलया हलवून उठवा
मला लागलाय खोकला

आला थंडीचा महिना
झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला
मधाचं बोट कुनी चाखवा

सिनेमा : ह्योच नवरा पाह्यजे
शब्द : दादा कोंडके
संगीत : राम लक्षुमण
गाइका : उषा मंगेशकर
« Last Edit: February 18, 2013, 11:27:07 AM by केदार मेहेंदळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: आला थंडीचा महिना
« Reply #1 on: October 08, 2013, 02:58:42 PM »
all time lavani best ..

usha taincha apratim theka ..