चित्रपट - सनई चौघडे
गीत - आयुष्य हे ......, गायिका -सुनिधी चौहान
भिजलेल्या क्षणांना, आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन् कांती
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे || धृ ||
नात्यांच्या या बाजारातील विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवी शतजन्माच्या गाठी
रोज नटावे, रोज सजावे, धरून आशा खोटी
पाने मिटुनी लाजाळू परी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे........|| १ ||
दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना
अन् मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पाहताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे........|| २ ||
भूतकाळच्या धुऊन अक्षता तांदूळ केले ज्यांनी
आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भाटयांनी
भविष्य आता रंगविण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरल्या मेहन्दीवर ओतून कडूलिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे........|| ३ ||