सूर्य
वृत्त----लज्जिता
गालगा गालगा लगागागा
मात्रा--- १७
आणला सूर्य मी जरी आता
तारका शोध तू परी आता
सांगतो राज हा नभी तारा
जागला का कधी वरी आता
पेटतो तो कसा असा सारा
झाकतो आज मी तरी आता
आग ओकून हा थके नाही
सापळा लावला खरी आता
येथली भ्रांत का पड़े कोना
झोपलो मी उशी वरी आता
सूर्य
३०/१०/२००९