चित्रपट :-अगं बाई अरेच्या !!!!!
गायक:-शंकर महादेवन
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधान वा-याचे
ग़ुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वा-याचे
ग़ुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वा-याचे
मन उधान वा-याचे
आकाशी स्वप्नांच्या हरखून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच फिरते
सावरते बावरते घर ते अडकते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर
मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
आणि क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उधान वा-याचे
ग़ुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वा-याचे
मन उधान वा-याचे
रुणझुणते गुणगुणते
कधी गुंतते हरवते
कधी गह-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणाला मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरीहे भासांच्या मागून पडते
मन उधान वा-याचे
ग़ुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधान वा-याचे
मन उधान वा-याचे