चित्रपट:- निवडूंग
गायिका:-पद्मजा फेणाणी जोगळेकर
*****************************************
लवलव करी पात, डोळं नाही था-याला
एकटक पाहू कसं, लुकलुक ता-याला ||धृ||
चवचव गेली सारी, जोर नाही वा-याला
सूट सूट झालं मनं, धरू कसं पा-याला ||१||
कुणी कुणी नाही आलं, फडफड गं राव्याची
रुणझुण हवा का ही, गाय उभी दाव्याची ||२||
तटतट करी चोळी, तुटतुट गाठीची
उंब-याशी जागी आहे, पारूबाई साठीची ||३||