शाप आहे मजला की,भोग आहेत जीवनाचे
करत गेलो मी , पापाचे घडे भरत गेले.
का ? मखमली मुठीत घट्ट होत गेलो
जाग येताच हातातील वाळवंट सरत गेले.
पाहतो आहे संसार गंभीर होऊनी मजला
काय अभागी आहे नातेही सोडून गेले .
आता उगा का रडे हताश होऊनी
प्रेमही गेले अन प्राणही विझून गेले.
सुनिल संध्या कांबळी
९८९२२८९१५१